ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे ॥
🏵🌻🌺🙏🏼🌺🌻🏵 *!! नवार्णव मंत्राचा अर्थ..!!* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 माता भगवती जगत जननी आहे, दुर्गा आहे. मातेच्या साधनेत नवार्ण मंत्राला महामंत्राचे स्थान आहे. नवार्ण = नऊ अक्षराचा मंत्र. या मंत्रामध्ये नवग्रहांना नियंत्रित करण्याची शक्ती आहे. हा महामंत्र इतर साऱ्या मंत्रापेक्षा व स्तोत्रापेक्षा श्रेष्ठ आहे. भगवती दुर्गेचे प्रामुख्याने तीन रूपे आहेत, महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती. या तिन्ही रूपांची साधना करण्यासाठीचा हा अति प्रभावी असा बीज मंत्र आहे. त्याच बरोबर मातेच्या नऊ रूपांचा हा एक संयुक्त मंत्र आहे, ज्याने नवग्रहांना शांत केले जाते. ॥ ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे ॥ नऊ अक्षराच्या या अति अद्भुत नवार्ण मंत्रामध्ये दुर्गा देवीच्या नऊ शक्ती सामावलेल्या आहेत, ज्यांचा संबंध नवग्रहांशी आहे. ऐं = महासरस्वती चा बीज मंत्र आहे, ह्रीं = महालक्ष्मीचा बीज मंत्र आहे. क्लीं = महाकालीचा बीज मंत्र आहे. याच बरोबर खाली दिलेल्या नवदुर्गेच्या मंत्राप्रमाणे प्रथमं शैलपुत्रीच, द्वितीयं ब्रम्हचारिणी | तृतीयं चन्द्रघंटेती, कुश्मांडेती चतुर्थकम || पंचमं स्कन्दमातेती, ष...